शिरोळ /ता : ६
सलग दोन-तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याने मुंबई दौरा अर्धवट सोडून मतदारसंघात दाखल झालेल्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी शिरोळ येथे गुरुवारी सकाळी प्रशासनाची तातडीने आढावा बैठक घेतली. संभाव्य पूर परिस्थिती बाबत प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. शिरोळ तहसीलदार कार्यालयामध्ये झालेल्या आढावा बैठकीसाठी तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ यांच्यासह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महापुराबाबतचा इशारा देणारी पातळी पाण्याने गाठली . सर्वप्रथम जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेची व्यवस्था व्हावी . तशा सूचना नागरिकांना देण्याची व्यवस्था करावी . पाटबंधारे विभागाने वेळोवेळी नद्यांमधील पाणी पातळी आणि धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग याबाबत तालुका प्रशासनाला अवगत करावे . अलमट्टी मधील विसर्गाबाबत कर्नाटक पाटबंधारे विभागाशी सततचा संपर्क ठेवावा . गटविकास अधिकारी यांनी गावागावातील लाकडी नौका सज्ज ठेवाव्यात . आरोग्य यंत्रणेने कोरोना बाधित व अलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांची व्यवस्था करावी . पूरपरिस्थिती उद्भवल्यास राज्य परिवहन महामंडळाने कवठेगुलंद, टाकळीवाडी व ज्या ठिकाणी पूर बाधित रुग्णांसाठी स्थलांतर केंद्र सुरू केली जातील . अशा ठिकाणी एसटी बसेस ड्रायव्हरसह हजर ठेवाव्यात,
ग्रामसेवक, तलाठी वीज मंडळाचे अधिकारी यांनी आपले नेमणुकीचे ठिकाण सोडू नये . पुरबाधित होणाऱ्या तालुक्यामधील सर्व गावांमधील पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना महसूल विभागाने द्याव्यात . अशा गावांमध्ये पोलीस अथवा होमगार्ड यांच्या नेमणुका कराव्यात. असे आदेश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीस उपस्थित सर्व विभागाच्या प्रमुखांना दिले . पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर परिस्थिती उद्भवणार नाही . याबाबत आश्वस्त केले, पण गाफील न राहता प्रशासनाने सर्व तयारी सज्ज ठेवावी . अशा सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या,
बैठकीस शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील , गटविकास अधिकारी शंकर कवितके, जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, शिरोळचे मुख्याधिकारी तैमुर मुलानी, पी एस कोळी शाखाधिकारी पाटबंधारे कुरुंदवाड, एस . ए . उपाध्ये पाटबंधारे विभाग जयसिंगपूर, एस बी शिंदे आगारप्रमुख कुरुंदवाड, सांगली पाटबंधारे विभागाचे श्री मुंजाप्पे, पूजा पाटील प्रशासकीय अधिकारी कुरुंदवाड, पोलीस निरीक्षक कुंभार शिरोळ, दत्तात्रय बोरीगीड्डे जयसिंगपूर, निरावडे कुरुंदवाड यांच्यासह जयसिंगपूर नगरपरिषदेचे अतुल घुटुकडे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
