मुंबई/ प्रतिनिधी
करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या शनिवारी व रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावला जाणार असून येत्या शनिवारी (१० एप्रिल) आणि रविवारी (११ एप्रिल) कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय करोना (corono) नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स आजच जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकलसेवा मात्र जशी सुरू आहे तशी सुरू राहणार आहे.