शिरोली /ता : ८ प्रतिनिधी
महावितरणच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या कारभाराने पुलाची शिरोलीचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येथील तांञीक काम करीत असलेल्या लाईनमन् वर कोणाचाही अंकुश नसून मनमानी कारभार चालु असुन या गैरप्रकाराने नागरीक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. यातुन कधीही प्रक्षोभ होण्याची शक्यता आहे .
गावात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी असे सुमारे दहा हजार ग्राहक असुन वीज बील एक कोटीहून अधिक वसुली असणार्या पुलाची शिरोली गावासाठी दिवसभरासाठी केवळ दोनच सेवा कर्मचारी देऊन महावितरणने गावाची थट्टाच केली आहे. हे कर्मचारी दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत काम करणारे आहेत . त्यांच्यामध्ये एकमेकांत ताळमेळ नसल्याने ग्राहकांच्या तक्रारीचे निरोप न देता निघून जातात. त्यामुळे ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार निवारण करण्यासाठी महावितरणने दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक अनेक वेळा उचललाच जात नसुन चुकून उचललाच तर आम्ही लाईटच्या पोलवर चढलो होतो. गाडी चालवत होतो . तुमचे काम बोला अशी उडवाउडवीची उद्घट उत्तरे देवुन वीज ग्राहकांना दिली जात आहेत . त्यानंतर पुढची चार – पाच कामे संपली की तुमचा प्रॉब्लेम सुटेल असे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला दिवसा काम करणारे केवळ दोनच सेवा कर्मचारी व रात्र पाळीत वरवरचे काम करणारे मग दिवसभर काम करून तक्रारी संपणार कशा असा मोठा प्रश्र निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पुलाची शिरोली गावासाठी कनिष्ठ अभियंता दर्जाचा कायमस्वरूपी अधिकारी व आणखी दोन सेवा कर्मचारी वाढवून मिळावेत . अशी मागणी होत आहे. याबाबत शिरोली ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी पाठपुरावा करावा . अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.