वीज वितरणकडुन कायमस्वरूपी आधिकारी यंत्रणा गतिमान ;एम.एस.के च्या वृत्ताची दखल

पुलाची शिरोली/ ताः ९ प्रतिनिधी

          एम.एस.के डिजीटल न्युज पोर्टलने ‘महावितरणच्या कामकाजात कुठं तरी मेळ नाही तर सगळा गैरमेळ ‘ अशा मथळ्याचे वृत्त रविवारी सकाळी प्रसिद्ध केले होते . या वृत्ताची गंभीर दखल घेवुन रविवारी दुपारी दीड वाजता बापट कॅम्प , कोल्हापूर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र महाद्वार व अन्य आधिकारी यांनी अचानक शिरोली येथील वीज वितरण कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला. गेल्या आठ महिन्यापासुन वीज वितरण कंपनीचे आधिकारी शिरोलीमध्ये फिरकले सुध्दा नाहीत . मात्र आज रविवार सुट्टी असुन सुद्धा भेट दिल्याने नागरिकांतुन आश्चर्य व्यक्त होत आहे .

          शिरोली कार्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नेमणूकीसाठी वीज वितरण कंपनीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत‌. शिरोलीची लोकसंख्या सुमारे पन्नास हजारच्या जवळपास असुन दहा हजार पर्यंत घरगुती , व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची संख्या आहे . तर सुमारे सव्वा कोटी रुपये मासिक महसूल आहे.

          अशा शिरोली कार्यालयाचा कारभार गेल्या आठ महिन्यापासून गांधीनगर येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अतुल सुतार यांच्याकडुन रामभरोसे चालु होता . परिणामी शिरोली कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नव्हता . त्यामुळे येथील कामगार घरगुती व शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. तर मार्बल व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक , कारखानदार , गोडावून मालक, यांनाच प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या येथील ग्रामस्थांना पहावयास मिळत होते. याबाबत एम.एस.के. डिजीटल न्युज या सोशल मीडियामध्ये सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे शहर मुख्य अभियंता श्री. एन.आर. गांधले , सहाय्यक अभियंता श्री . कवाळे यांनी रविवारी तात्काळ हालचाली करून बापट कॅम्प येथील कार्यकारी अभियंता श्री. महाद्वार यांना भेट देण्यास सांगितले. श्री . महाद्वार यांनी दुपारी दीडच्या सुमारास शिरोली कार्यालयात येऊन कामाचा आढावा घेतला . तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन चांगलीच कान उघाडणी केली. एकूणच शिरोली सारख्या मोठ्या महसुली गावात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नाही. हे गावाचे दुर्दैव्य म्हणायचे कि ग्राहकांची चेष्टा म्हणायची. अशी म्हणण्याची वेळ शिरोलीकरांवर आली आहे. तरी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करून शिरोलीच्या ग्राहकांना तात्काळ व चांगली सेवा देण्यासाठी विजवितरणने हालचाली सुरू केल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

       आपणाकडे गांधीनगर व पुलाची शिरोलीचा अतिरिक्त कार्यभार आहे . त्यामुळे येथील कामगारांच्यावर आपण विश्वास ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण त्यांच्याकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचे समजले. भविष्यात चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.
-अतुल सुतार ( कनिष्ठ अभियंता , गांधीनगर)

error: Content is protected !!