पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा यशस्वी करा : संजय चौगुले

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा

पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे गुरुवार २१ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत व त्याच दिवशी सायंकाळी ०५:०० वाजता मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटल समोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान हातकणंगले येथे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लोकसभेच्या हातकणंगले वतीने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात येणार असून रॅलीने सभेसाठी शिवसैनिक रवाना होणार आहेत. सायंकाळी ३:३० वाजता हातकणंगले येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले आहे.

error: Content is protected !!