माने हॉस्पिटलमध्ये पॉझिटीव्ह, स्थानिक आक्रमक ; नगरपंचायत हडबडुन जागी

हातकणंगले /ता : २४

              हातकणंगले -वडगांव मार्गावरील माने हॉस्पीटलमध्ये एका पेशंटला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे हातकणंगले नगरपंचायत अधिकाऱ्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. इचलकंरजी येथील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शहापूरमधील एक पेशंटला हॉस्पिटलमध्ये दोन दिवसापूर्वीच ॲडमिट केले होते. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याचा स्वॅब आयजीएमला दिला होता. त्यांचा अहवाल काल संध्याकाळी पॉझिटिव्ह आला. ही बाब डॉक्टरनी अथवा तेथील कर्मचारी यांनी नगरपंचायतीला कळविणे गरजेचे होते. पण कळविणेत आले नाही. परिसरातील जागरूक नागरिकांनी नगरपंचायतीला त्वरित कळविले.
                नगरपंचायत अधिकाऱ्यांनी फोनवरुन माहिती घेतली. सदर परिसर किंवा हॉस्पिटल निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणीही न आल्यामुळे नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासन तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये आणखी एक पेशंट ॲडमिट असल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा मात्र प्रशासनाने कडक भूमिका घेऊन सर्व परिसर आणि हॉस्पिटल निरजंतूकीकरण केले. हॉस्पिटल हे मुख्य रस्त्यावर आहे. येथे मेडीकलसह अन्य चार जण काम करतात. येथूनच शहरातील आणि अन्य गावातील लोकांची तसेच पेशंटची ये-जा सुरू असते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
              यावेळी आरोग्य सभापती मुजावर यांनी भेट दिली. याच परिसरात आणखी एक डॉक्टर पुणे येथे शासकीय नोकरीत असतानाही दर आठवड्याला येथे येवून हॉस्पिटल सुरू ठेवतात. त्यांना पण हॉस्पिटल बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

error: Content is protected !!