हातकणंगले/ता.१७ (प्रतिनिधी )
हातकणंगले नगरपंचायत साठी शववाहिका मिळावी. यासाठी माणुसकी फोंडेशनच्या वतीने आरोग्य मंत्री श्री. राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नाम . यड्रावकर यांनी माणुसकी फोंडेशनच्या स्वयंसेवकांशी सविस्तर चर्चा केली .
फोंडेशनच्या स्वयंसेवकांनी चर्चेत सांगितले . व निवेदनात म्हटले आहे की , हातकणंगले नगरपंचायतीचा विस्तार मोठया प्रमाणात वाढत आहे. शाहूनगर, गणेश नगर,पेठा विभाग, लक्ष्मीनगर, श्रीनगर या ठिकाणापासून स्मशानभूमी 3 ते 4 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते.परिणामी नागरिकांची आणि पाहुणे मंडळींची गैरसोय होते. आम्ही स्वतः शाहूनगर मध्ये राहत असून आम्हाला शववाहिका नसलेने मोठी गैरसोय होते. एखादी व्यक्ती मृत झाल्यास तीन ते चार किलोमीटर चालत जावे लागते. यासाठी बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागते. सदरची गैरसोय लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर शववाहिकाची सोय करून द्यावी . अशी समस्त हातकणंगले गावच्या नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे.
राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी निवेदन स्विकारून यावर लवकरच शववाहिका उपलब्ध करून द्यायचे आश्वासन दिले.आणि फोंडेशन च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन कुंभार ,सागर नलवडे, , बाबासाहेब नंदीवाले, सचिन बोराडे, अभि बोराडे, प्रविण उपाध्ये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
