संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात संपन्न

     संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये “मराठी भाषा गौरव दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयसिंगपूरचे जेष्ठकवी, साहित्यिक वि. दा. आवटी, इचलकरंजीचे प्रसिद्ध कवी प्रा. रोहित शिंगे, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी, कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन कांबळे, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक, प्रा. सुहास पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

मातृभाषेचा गौरव म्हणून व “कुसुमाग्रज” यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून ‘कुसुमाग्रज’ यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी केले. मातृभाषेचा उगम, इतिहास, सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी भाषेचा निर्माण झालेला शब्दकोश यावर मार्गदर्शन करून उपस्थितांना मातृभाषेचे महत्त्व प्रेम आणि भाषेमधून मिळणारी प्रेरणा या महत्त्वाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. शिंगे यांनी मराठी भाषा आणि कविता परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या स्वरचित काही मोजक्या कविता सादर केलेल्या त्यांच्या कवितांना विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉ. वि. दा. आवटी यांनी जीवनात मातृभाषा कशी उंचीवर नेऊन ठेवते मातृभाषे तून केलेले कार्य मातृभाषेतून झालेला अभ्यास आणि विद्यार्थी जीवनात मातृभाषा परिणाम या विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. सचिन कांबळे यांनी आपल्या काही कविता सादर केल्या असून प्रा. सुहास पाटील यांनी मराठी भाषा वरील प्रेम या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका गुरूव, आणि कु. समृद्धी या विद्यार्थिनी केले असून कार्यक्रमाचे आभार कु. निकिता पाटील या विद्यार्थिनीने मानले आहे.

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले “मराठी भाषा गौरव दिन” या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!