मर्दा फौंडेशनतर्फे सेवाभावी विविध संस्थांना निधी प्रदान

इचलकरंजी

 येथील श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फौंडेशन आणि मर्दा परिवाराच्या वतीने इचलकरंजी शहर व कोल्हापूर जिल्ह्यातील आणि बाहेरीलही काही सातत्याने कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांना प्रतिवर्षीप्रमाणे सहयोग निधी प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि पर्यावरण, इत्यादी क्षेत्रात नियमितपणे कार्यरत असलेल्या १७ संस्थांना ११ लाख रुपये निधी देण्यात आला.
 ज्येष्ठ कामगार नेते शामराव कुलकर्णी, वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे गिरीराज मोहता, माहेश्वरी समाज इचलकरंजीचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा, लेखाकुलकर्णी यांनी समाजसेवेचा दृष्टिकोन ठेवून मर्दा फौंडेशनच्यावतीने विविध उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर अनेक संस्थांना सहभाग परीक्षक श्रीकिसन भुतडा, फौंडेशनचे विश्वस्त लक्ष्मीकांत मर्दा यांच्या हस्ते सर्व संस्था प्रतिनिधींना निधी वितरित करण्यात आला. 
 कुलकर्णी यांनी समाजसेवेचा दृष्टिकोन ठेवून मर्दा फौंडेशनच्यावतीने विविध उपक्रम घेतले जातात. त्याच बरोबर अनेक संस्थांना सहभाग निधी प्रदान करून समाजाप्रती दायित्व निभावले जाते हे महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. मोहता यांनी उद्योग, व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यामधील काही भाग दरवर्षी सामाजिक दृष्टिकोनातून विविध संस्थांना देण्याची कृती अनुकरणीय आहे, असे सांगितले.
 कार्यक्रमात सीए भुतडा यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीकांत मर्दा यांनी सर्व पाहुण्यांना स्वागतपर गुलाबपुष्प प्रदान केले. फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा यांनी ट्रस्टची भूमिका विषद केली. मर्दा फौंडेशनचे विश्वस्त राजगोपाल मर्दा उपस्थित होते.
माधव विद्यामंदिर (शैक्षणिक), वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्था (पर्यावरण), महेश शैक्षणिक सेवा टस्ट (शैक्षणिक) यासह विविध संस्थाना निधी प्रदान करण्यात आला.
येथील अरविंद हाऊस, वखार भाग येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समीर गोवंडे यांनी केले. आभार लक्ष्मीकांत मर्दा यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!