इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील महात्मा गांधी हौसिंग सोसायटीचे चेअरमन, मातंग समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती धोंडीबा निंबाळकर यांचे शनिवारी रात्री वार्धक्याने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. यशवंत प्रोसेसचे संचालक अरुण निंबाळकर यांचे ते वडील होत.
मातंग समाजाचे कुशल संघटक म्हणून ते परिचित होते. त्यांनी इचलकरंजी शिक्षक सेवा समितीचे अध्यक्ष, राधाकृष्णन प्राथमिक शिक्षक सह. पत संस्थेचे चेअरमन म्हणूनही काम पाहिले. इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळेत ते शिक्षक होते. त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही धुरा वाहिली. अखेरच्या श्वासापर्यंत ते शैक्षणिक व सामाजिक कार्यात कार्यरत होते.