१ मे – दिनविशेष

१७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.

१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.

१८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.

१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.

१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

१८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.

१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.

१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.

१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.

१९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.

१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.

१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.

१९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. 

१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. 

२०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.

संग्रहित माहिती

error: Content is protected !!