Special day ११ मे – दिनविशेष

१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

१८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.

१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

१९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.

१९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.

१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

१९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.

१९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

१८८९: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन.

२००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन.

२००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन.

error: Content is protected !!