१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
१९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.
१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.
१९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.
१९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
१९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
१९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
१९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.
२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अॅबोटाबाद येथे हत्या केली.
२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
१९९८: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन.
१९९९: जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.
२०११: अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले.
संग्रहित माहिती