४ मे – दिनविशेष

१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.

१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.

१९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.

१९५९:  पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.

१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.

१९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.

१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म.

१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. 

१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.

१९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.

१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.

१९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.

१९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.

१९८४: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म

संग्रहित माहिती

error: Content is protected !!