८ मे – दिनविशेष Special day

१८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.

१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९४५: दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.

१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.

१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

१९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.

१९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. 

१९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.

१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.

१९८९: भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म.

१९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन.

१९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.

१९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.

२००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. 

२०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन.

२०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन.

संग्रहित माहिती

error: Content is protected !!