१८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्या ट्राम सुरू झाल्या.
१८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
१९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
१९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.
१९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.
१९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
१९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१५४०: मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म.
१८१४: अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म.
१८६६: थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म.
१८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म.
१९२८: समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म.
१३३८: भगवद्भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्या कुसबाखाली सापडला.
१९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.
१९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन.