‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आरोग्य मोहिम राबवून सहा गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. राहुल देशमुख.

हेरले / प्रतिनिधी
  हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या सहा गावांमध्ये कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढला आहे. यांची गंभीर दखल घेवुन राज्य शासनाची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘या आरोग्य अभियान अंतर्गत समुह कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना अभियान १५ सप्टेबर ते २५ ऑक्टोबंर पर्यत लोकसंख्या निहाय्य दोन वेळा सर्वेकरून रूग्ण शोध मोहीम सुरू करून त्यांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून सहा गावे कोरोना मुक्त करणार असल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
   कोरोना संसर्ग मार्च ते ऑगस्ट पर्यंत वाढत आहे. सद्या समुह संसर्ग वाढल्याने हेरले, अतिग्रे, मुडशिंगी, माले, अतिग्रे,रूकडी या गावांमध्ये रूग्ण संख्या गंभीर बनली असून २८७ झाली आहे. जिल्हा अधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शन्वये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या आरोग्य अभियान्वये १५ सप्टेबंर ते २५ ऑक्टोबर रूग्ण शोध मोहिम सुरू करणार आहोत.

    या अभियानमध्ये आरोग्य शिक्षण, आरोग्य संदेश देऊन, ह्रदयविकार , लठ्ठपणा, मधुमेह रूग्ण, किडणी आजार, संशयित कोविड रुग्ण आदींचा शोध घेऊन तपासणी केली जाणार आहे. व त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे .गावतील व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदार यांना आवाहन करून त्यांचे स्वॅब तपासणी केली जाणार आहे. सर्व मेडिकल शॉप व खाजगी डॉक्टरकडून रुग्णांची माहिती घेऊन त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांवर आरोग्य केंद्रात तात्काळ उपचार केले जाणार आहेत.
   या मोहिमेमध्ये एक वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस आशा स्वयंमसेविका, बेचाळीस अंगणवाडी सेविका , चार आरोग्य सेविका, तीन आरोग्य सेवक, सहा आरोग्य सहाय्यक कार्यरत असणार आहेत. पंचेचाळीस स्वयंमसेवकांची आवश्यकता आहे. या सेवकातून तीन जणांचा गट करून दररोज ५० घरांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वे मोहिमेतून रुग्णांना शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जाणार असून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे.
     आज पर्यंतची आरोग्य मोहिम यशस्वी करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, पोलिस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहूल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच संदीप चौगुले, मुनिर जमादार आदींची मदत व सहकार्य लाभलेले आहे. पुढील आरोग्य मोहिम यशस्वी करण्यासाठी सहा गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोरोना सनियंत्रण समिती सदस्य व स्वयंमसेवकांनी मदत करून कोरोना मुक्त गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे. 

error: Content is protected !!