वारणा कडून महाशिवरात्रीनिमित्त सभासदांना मिळणार तूप

वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त सभासदांना तूप देण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.

वारणा दूध संघाच्या ज्या ‘अ’ वर्ग सभासदांनी शेअर पूर्ण केले आहेत व जे उत्पादक दुधाचा गावातील दूध संस्थामार्फत संघास पुरवठा करतात अशा ‘अ’ वर्ग ‘ब’ वर्ग संस्था सभासद व राज्यभरातील ‘क’ वर्ग ग्राहक सभासदांना दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी व

दीपावली या सणांना सवलतीच्या दरात तूप भेट म्हणून दिले जाते. याबाबतचे परिपत्रक संघाने संबंधित सर्व दूध संस्थाना पाठविले आहे. कोल्हापूर व परिसरातील ‘अ’ वर्ग व ‘क’ वर्ग सभासदांचे तूपाचे स्टेशन रोड कोल्हापूर विक्री केंद्रातून ४ मार्चपासून वाटप सुरू होईल. ओळखपत्र अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप सभासदांनी घेऊन जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एचआर जाधव, अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, संचालक, अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!