राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मा. आम. मिणचेकर यांचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देताना मा. आम. डॉक्टर सुजित मिणचेकर व व अन्य मान्यवर

हातकणंगले / ताः ८

        भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजग्रहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी . अशी मागणी मा. आम. डॉ . सुजित मिणचेकर यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे केली आहे .
          निवेदनात म्हटले आहे की , दादर येथील राजगृहाच्या आवारात घुसून काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला करीत धुडगूस घातला आहे . हे कृत्य निंदनीय आहे . राजगृह ही वास्तु केवळ आंबेडकरी जनतेची नसून संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान आहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ खजिना या वास्तूत जपून ठेवला असून जगभरातील लाखो अनुयायी दररोज या वास्तूच्या भेटीला येत असतात . तसेच भारतातील जनतेचे ते तीर्थक्षेत्र आहे . त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करून समाजकंटकांचा त्वरित शोध घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे . यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव शिवसेना जिल्हा युवा अधिकारी हर्षल सुर्वे उपस्थित होते .

error: Content is protected !!