अल्पसंख्यांक समाजातील जातीच्या दाखल्यासाठी निवेदन देणार – हाजी शकील अत्तार

हातकणंगले / प्रतिनिधी
अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक व शैक्षणिक तसेच मुस्लिम समाजातील जातीचे दाखले काढताना व जात पडताळणी करताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच समाजातील कोणावरही अन्याय होऊ नये. याबाबतच्या अडचणीचे निराकरण होण्यासाठी संबंधित जात पडताळणी विभागाला निवेदन देणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा मुस्लिम एबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाजी शकील अत्तार यांनी सांगितले. ते आळते (ता. हातकणंगले) येथील संघटनेच्या बैठकीत बोलत होते .
बैठकीस डॉ. पिरजादे , अन्सार देसाई , हिम्मत बारगीर , अझहर तहसीलदार , मोहसीन पोवाडे , शब्बीर कलावंत , फिरोज नदाफ , फिरोज मोमीन , अरिफ खतीब , असलम पठाण , बशीर नायकवडे , इम्रान खोचरगी , सलमान देसाई , अरिफ सौदागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .

अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाने योग्य भूमिका घेऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणावे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने 18 डिसेंबर या दिवशी अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात येणार असून त्यात अल्पसंख्यांक समाजाच्या अडीअडचणी मांडण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

error: Content is protected !!