हुपरी / प्रतिनिधी
हुपरी (HUPARI) ते तळंदगे रस्त्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी आम . राजुबाबा आवळे यांच्या प्रयत्नातुन व त्यांच्या फंडातुन मंजुर करणेत आला होता . परंतु तो निधी अपुरा पडत असलेने रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आम. राजुबाबा आवळे यांनी निधी कमी पडु देणार नसल्याचे व तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते . ते त्यांनी पुर्ण केल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दुर झाली.

हुपरी ते तळंदगे रस्त्याच्या उद्घाटन दिवशी गावातील नागरीकांना आम . राजुबाबा आवळे (MLA. Rajubaba Awale) यांनी दिलेला शब्द पुर्णत्वास नेला व गजरेच्या घरा पर्यत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली . याबदल गावातील नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.