हातकणंगले /ता २९-प्रतिनिधी
तिळवणी (ता.हातकणंगले) येथील गजानन शिवाप्पा कोळी यांनी स्वतःच्या राहत्या घरावर विनापरवाना मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू केले आहे . गावातील पंचवीसहून अधिक नागरिकांनी टॉवर विरोधात ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली आहे . ग्रामपंचायतीने कोळी यांना टॉवरचे काम तात्काळ बंद करण्याची नोटीस लागू केली असून काम बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. आता टॉवर प्रकरणाला कसे वळण लागणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे .

ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता गजानन कोळी यांनी घरावर टॉवर उभा करण्यास सुरुवात केली आहे . त्यानंतर भविष्यकाळात आरोग्यास अपाय होऊन गंभीर आजार होऊ शकतो . अशी लेखी तक्रार प्रमोद कदम, डॉ. अशोक मगदूम, गोरख कोळी, एल्गार संघटनेचे लखन जाधव, सौ सविता बाळासो कोळी, निखिल लक्ष्मण माळी, रत्नाकर बैरागी, राहुल पाटील, सुशांत पाटील, अजित पाटील यांचेसह कबनूरे ,माणकापूरे मगदूम , बिरनाळे , चव्हाण , रेडेकर यांच्यासह पंचवीसपेक्षा आधिक ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिली आहे .

ग्रामपंचायतीने तक्रारीची तात्काळ दखल घेवुन काम बंद ठेवण्याची लेखी नोटीस लागू केल्याने खळबळ उडाली आहे . मात्र हे टॉवर प्रकरण कोणत्या वेगळ्या मार्गावर जाऊन त्याला राजकीय वळण लागणार काय ? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे . निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी आरोग्य विभाग व हातकणंगले पोलिस स्टेशनला दिल्या आहेत.