मुलाच्या निधनाच्या धक्क्याने आईचा मृत्यू

   मुलाच्या निधनाचा धक्का सहन झाल्याने पाठोपाठ आईचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजी येथील पुजारी मळा परिसरात घडली. प्रितम दादासो तेरदाळे (वय ३०) व सौ. शोभा दादासो तेरदाळे (वय ५४) अशी त्यांची नांवे आहेत. तर या दोघांच्याही मृत्यूच्या धक्क्याने वडीलांचीही प्रकृती अत्यवस्थ झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हृदद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची मिळालेली माहिती अशी, येथील पुजारी मळा परिसरात तेरदाळे कुटुंबिय राहण्यास आहेत. प्रितम तेरदाळे हा इंजिनिअर असून तो लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामास होता. मंगळवारी रात्री प्रितम हा घरात जेवण केल्यानंतर दारातच गप्पा मारत बसला होता. त्यावेळी अचानकपणे त्याला हृदयविकाराचा झटका आला. आई शोभा यांच्यासमोरच ही घटना घडल्याने त्यांनाही भोवळ आली. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आई व मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!