मौजे वडगावच्या उपसरपंचपदी सुभाष आकिवाटे

हेरले /ता : ३

उपसरपंच सुभाष आकिवाटे मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील उपसरपंचपदी सुभाष आकिवाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सरपंच काशिनाथ कांबळे यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे यांच्या उपस्थितीत नुतन उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा झाली .

सदस्यातुन सुभाष अकिवाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या नावाची घोषणा केली . यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला .

उपसरपंच किरण चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच काशीनाथ कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला होता . राजीनामा ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला .यानंतर विशेष सभेत नुतन उपसरपंच सुभाष आकिवाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध झाल्याची घोषणा केली .


यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे , माजी उपसरपंच किरण चौगुले , ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे , ग्रामविकास अधिकारी ए आर वीरकर , सहा. फौजदार निवास पवार ,अवधूत मुसळे , अविनाश पाटील , वैशाली गोरड , माधूरी सावंत , सुनिता मगदूम , सरिता यादव , सरताज बारगीर , आश्विनी लोंढे , मायावती तराळ ,यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!