खासदारांचा संपर्क नाही; ही विरोधकांची स्टंटबाजी, खासदार धैर्यशील मानेंचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यमान खासदारांचा जनसंपर्क घटला आहे. विकासकामे झाली नाहीत. अशी चर्चा विरोधक जाणीवपूर्वक करीत आहेत. ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, अशा शब्दात खासदार धैर्यशील माने यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला.

यावेळी खासदार धैर्यशील माने माझी यांची जनतेशी नाळ तुटली आहे, अशी चर्चा होत असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले, हा विरोधकांचा कांगावा आहे. माने घराण्याची समाजाशी कायमची नाळ जुळली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही बारा वेळा निवडणुका लढवल्या. त्यामध्ये लोकसभेच्या दहा निवडणुका लढवून आठ वेळा विजय मिळवला आहे. ही जनतेशी संपर्क असल्याची पोचपावती आहे. मी तर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, खासदार अशारीतीने वर गेलो आहे ते केवळ जनतेच्या सहकार्यामुळेच. त्यामुळे विरोधकांच्या असल्या टीके कडे लक्ष देण्याची गरज नाही.

error: Content is protected !!