कोल्हापूर / ता: २८
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे ,नागपूर , औरंगाबाद ,मुंबई , कोल्हापूर ,अमरावती ,नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2020 घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत वेबसाईटवरून (संकेतस्थळावर ) बुधवार ता . 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे . तसेच विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रत काढता येईल .संकेतस्थळ (वेबसाईट ) खालीलप्रमाणे …..
तसेच शाळांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल .
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी ,फेरतपासणी ,उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in/ या अधिकृत वेबसाइटवरून स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे .गुणपडताळणी साठी गुरुवार ता .30 जुलै ते शनिवार ता .८ ऑगष्ट पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतील . त्याची फी डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड , नेट बँकिंग , गुगल पे याद्वारे भरता येईल .
उत्तरपत्रिकेच्या फेर तपासणी साठी फोटोकॉपी आवश्यक आहे . फोटो कॉपी मिळाल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात ऑनलाइन फॉर्म भरण्याचा आहे . त्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचा आहे . अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ . अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे