
कोल्हापुर /ता : ८
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेले राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान असुन देशातील नागरिकांच्या भावना राजगृहाशी जोडलेल्या आहेत . याच राजगृहाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. या कृत्याचा तीव्र निषेध करून भ्याड कृत्य केलेल्या समाजकंटकावर त्वरित कारवाईची मागणी आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेने केली आहे .
राष्ट्रपुरुष हे कोणत्याही जातीचे व धर्माचे नसतात . त्यांनी मानव जातीसाठी कल्याणासाठी काम केलेले आहे . परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे सर्वश्रेष्ठ आहेत . डॉ . आंबेडकर यांनी घटना लिहिल्यामुळे आज आपण लोकशाही पद्धतीचे जीवन जगत आहोत . थोर कार्य करणाऱ्या अशा महामानवाचा ज्यांनी अपमान केला त्यांच्यावर कठोर कारवाई करणेची मागणी निवेदनाद्धारे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे केली आहे . यावेळी आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी सुरज कुलकर्णी , प्रसाद कुलकर्णी , दिलीप धर्माधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
