महाराष्ट्राला लाभलेले कार्यक्षम नेतृत्व मुख्यमंत्री ठाकरे -नाम राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ / ताः२७

              राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला लाभलेले कार्यक्षम नेतृत्व आहे . असे गौरवोद्धार नाम .राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले . मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून शिरोळ तालुक्यामधील कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्व सुविधायुक्त अशी रुग्णवाहिका प्रदान केली.
               कवठेगुलंद येथे झालेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मागील सहा महिन्यांमध्ये कोरोनाची महामारी, निसर्ग चक्रीवादळ एकापाठोपाठ एक अशी अनेक संकटे आली . शांत संयमी आणि धिरोदत्त नेतृत्व गुणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन या संकटांना समर्थपणे तोंड दिले. आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे निर्णय घेतल. त्यामुळेच राज्यासमोर अनेक अडचणी असतानासुद्धा राज्यातील जनतेने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये असलेल्या नेतृत्वगुणाची पाठराखण केली . आणि त्यांना साथ दिली असे नाम . यड्रावकर यावेळी म्हणाले .

स्थानिक विकास निधीमधून शिरोळ तालुक्यामधील कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्व सुविधायुक्त अशी रुग्णवाहिका प्रदान करताना नाम .राजेंद्र पाटील-यड्रावकर व अन्य मान्यवर

      महाविकास आघाडी सरकार आणि जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधार योजना राबविण्यासाठी एकूण खर्चाच्या 80 टक्के इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक आहे. मागील अनेक महिन्यापासून या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून जवळपास 14000 एकरावरील हजारो शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांची शेती समृद्ध होणार आहे .असे सांगताना शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन तातडीने क्षारपड जमीन सुधार योजना राबवावी . असे आवाहन ही राज्यमंत्री यड्रावकर यांनी केले.
           यावेळी स्वागत प्रकाश भेंडवडे यांनी केले, शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, प्रकाश पाटील टाकवडेकर या मान्यवरांनी आपल्या मनोगता मधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्याचा गौरव केला, जिल्हा परिषद सदस्या परवीन पटेल, पंचायत समितीचे सदस्य मल्लाप्पा चौगुले, शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे, कवठेगुलंदचे सरपंच सद्दाम हुसेन वाळवेकर, आदिनाथ आरबाळे, आनंदा कुम्मे, विनोद जगताप, संतोष धनवडे, भोला तकडे, असलम मखमला उपसरपंच आलास, प्रशांत अपीणे, यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . योगेश साळे, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . दातार आलास जिल्हा परिषद मतदारसंघामधील विजय कोळी, राजेंद्र कुचनुरे, धनपाल खोत, सईद पटेल, फजलेअली पटेल, आसलम मुल्ला व सर्व गावांचे सन्माननीय लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते, आभार संतोष कांबळे सर यांनी मानले

error: Content is protected !!