सांगली / ता: २५
गावात ,गल्लीत अथवा अपार्टमेंटमध्ये एखाद्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे नुसते समजले तरी शेजाऱ्यांचा थरकाप उडतो . त्या घरात जाण्याचे नव्हे , बघण्याचे धाडस सुद्धा कोणी करण्यास धजावत नाही . पण सांगली -कुपवाड येथील दोन कोरोणायोद्धे मिरज शासकीय मेडीकल कॉलेज येथील कोरोना शासकीय सेंटरमध्ये मोठ्या धाडसाने काम करीत आहेत . त्यांची नावे गुलाब जमखंडे व सुरेंद्र शेरबंदे अशी आहेत .

दोघेही इलेक्ट्रिक विभागातील तज्ञ आहेत . कोवीड सेंटरमध्ये इलेक्ट्रिक सुविधा ही सर्वाधिक अत्यावश्यक सेवेपैकी एक महत्त्वाची सेवा आहे . कोरोनाग्रस्त रुग्णाला व क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीला महत्वाची सुविधा देणेसाठी हे बिनधास्त जातात . कोवीड सेंटरमधून इलेक्ट्रिकच्या दुरुस्तीसाठी निरोप आल्यास तात्काळ ते पीपीइ कीट घालून कामाला लागतात . दोघेही कोवीड सेंटरमधील पंखे , ट्यूब्ज , बल्ब , एक्झॉस्ट फॅन बसविण्याचे व दुरुस्ती करण्याचे काम करतात . रुग्णाला आवश्यक असणारे गरम पाण्याचे गिझर , शुद्ध पाण्याचा वॉटर प्युरिफायर , मेडिकल ट्रीटमेंटसाठी लागणारे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट जागेवर काढून अथवा दुरूस्त करून देण्याचे काम अगदी बिनधास्तपणे करत आहेत . मिरज मेडिकल कॉलेजचे शासकीय कोवीड सेंटरमधील इलेक्ट्रिकचे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागामार्फत एस.एस. इलेक्ट्रिकल्सचे शितल शहा व मे .पॉवरलाईन इलेक्ट्रिकल्सचे अजित सुर्यवंशी यांनी केले असून दोन्ही फर्मचे धाडसी शिलेदार गुलाब जमखंडे व सुरेंद्र शेरबंदे हे असून त्या देवरूपी सेवेला सलाम
