हातकणंगले/प्रतिनिधी
कबनूर तालुका हातकणंगले येथे सौ शोभा पवार यांची सरपंच पदी तर उत्तम उर्फ सुधीर पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाली.
मंडल अधिकारी जेरान गोन्साल्विज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सुधीर लिगाडे, समीर जमादार, रजनी गुरव, रोहिणी स्वामी, सुनील आडके, मधुकर मनेरे स्वाती काडाप्पा, सैफ मुजावर, अर्चना पाटील, वैशाली कदम, सुलोचना कट्टी, प्रवीण जाधव, सुधाकर पाटील, सुनील काडाप्पा, बी. टी. कुंभार, एम. डी. पाटील, शिवाजी चव्हाण यांसह मान्यवर उपस्थित होते