हातकणंगले माणुसकी फोंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याची टाकी केली स्वच्छ

हातकणंगले वार्ताहर/रोहन साजणे

      हातकणंगले (Hatkanangle) शाहूनगर माळभाग येथील पिण्याच्या पाण्याची टाकी माणुसकी फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छ करण्यात आली.

   शाहूनगर माळभाग हातकणंगले मधील पाण्याच्या टाकीतून प्रभाग क्रमांक 3 आणि 4 साठी पाणी पुरवठा होत आहे. काही दिवसापासून पाण्यातून गाळाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. पिण्याच्या साठपात गाळ दिसत आहे अशी तोंडी तक्रार वारंवार नागरिकांतून येत होती. सदर पाण्याची टाकी दोन वर्षांपासून स्वच्छ केली नाही. ही बाब लक्षात घेऊन माणुसकी फोंडेशन ने वर्धापन दिनानिमित्त पाण्याची टाकी स्वच्छ करून सामाजिक बांधिलकी जोपसली.यावेळी सर्व सदस्य सकाळी 6.00 वाजता टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरून स्वच्छ केली.त्यानंतर 9.00 वाजता शिवज्योत मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी केली. यावेळी या कार्याबद्दल नागरिकांतून कोतूक होत होते. माणुसकी फोंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेचे दिसून येते. यावेळी सागर नलवडे,सचिन कुंभार्, सचिन बोराडे, बाबासाहेब नंदिवाले, सखाराम कदम, गोमटेश रुकडे, अभि बोराडे, गणेश धुलुगडे उपस्थित होते.

error: Content is protected !!