महाराष्ट्र पोलिसांच्या यशात मानाचा तुरा, उपनिरीक्षक पल्लवी जाधव मिस इंडिया नंबर वन

जालना / प्रतिनिधी          

        राजस्थानमधील जयपूर येथे नुकतीच ग्लमोन मिस इंडिया (Glammon miss India 2020) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जालना शहरातील दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. यामुळे पोलीस दलाची मान आणखीन उंचावली आहे.
   पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) मोठी जबाबदारी सांभाळत छंद जोपासणे तसे सोपे काम नाहीये. पण हे काम करून दाखवले ते जालन्यातील पोलीस अधिकारी पल्लवी जाधव (Pallavi Jadhav) यांनी. कामाचा व्याप, आपली जबाबदारी उत्कृष्टपणे निभावत पल्लवी यांनी आपला छंद जोपासला आहे. तो छंद काम केले नाही तर त्याला यशात रुपांतरीत केले आहे. राजस्थान येथील जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लमोन मिस इंडिया’ स्पर्धेत उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

   पल्लवी जाधव यांचा जीवनप्रवास तसा संघर्षमय राहिला आहे. हातात कोयता धरून ऊस तोडणाऱ्या, रोजगार हमी योजनेच्या कामात कामावर खड्डे खोदणाऱ्या आणि मिळेल ते काम करणाऱ्या कुटुंबाने रक्ताचे पाणी करून त्यांना शिक्षण दिले. २० मे २०१५ रोजी पल्लवी यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. ऑक्टोबर २०१५ नंतर एक वर्ष प्रशिक्षण घेऊन एमए मानसशास्त्र या विषयात देखील पारंगत असलेल्या पल्लवी यांनी विधिज्ञ म्हणूनही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.

error: Content is protected !!