जवाहर विद्यालयात बक्षिस वितरण समारंभ

इस्लामपूर / प्रतिनिधी
    कापूसखेड ता. वाळवा येथील जवाहर विद्यालयात जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त ‘जयंत करिअर सप्ताह’ अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण व खाऊ वाटप करण्यात आले.

    शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, माणिक पाटील, मीरा गुरव, शुभांगी मदने, सविता माळी, संगिता सुपने, छगन पाटील, उषा पाटील यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. माणिक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक एस.आर.गोंदील यांनी स्वागत केले. व्ही.ए.बोडरे यांनी आभार मानले. सी.एम.माने यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!