कुंभोज/ वार्ताहर

हातकणंगले (hatkanangale) तालुक्यातील बहुप्रतीक्षित कुंभोज (Kumbhoj) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी माधुरी घोदे व उपसरपंच पदी दावीद घाटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सतरा सदस्यीय असणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लोकविकास कडे ५ व महाविकास कडे १२ असे संख्याबळ होते. यावेळी लोकविकास कडून सरपंच (sarpanch) पदासाठी विशाखा माळी व उपसरपंच पदासाठी संभाजी मिसाळ यांनी अर्ज दाखल केला होता. तसेच महाविकास आघाडीच्या वतीने सरपंच पदासाठी माधुरी घोदे व उपसरपंच पदासाठी दावीद घाटगे यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी संभाजी मिसाळ व विशाखा माळी यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही माघार घेतली आहे असे मत लोकविकास चे मिसाळ व माळी यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच म्हणून माधुरी घोदे व उपसरपंच पदी दावीद घाटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजीत घोरपडे यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे. होते.
स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी केले आभार शांतीनाथ धरणगुत्ते यांनी मानले.
यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील यांचा समस्त मातंग समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.