सामान्य कुटुंबातील कामगारापासुन यशस्वी उद्योजकाचा खडतर प्रवास …..

  हातकणंगले तालुक्यातील आळते सारख्या ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य कुटुंबातील सुदाम राजाराम चव्हाण नावाचे व्यक्तिमत्व. वडील शेती व वारकरी सांप्रदायाचे अभ्यासक तर आई गृहिणी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच.
  1993 साली बारावीची परीक्षा झाल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रणवादित्य स्पिनिंग मिल मध्ये हेल्पर म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेता घेता मिलमध्ये मशीन ऑपरेटर व नंतर ‘निटिंग मशीन फिटर ‘ या पदावर आठ वर्षे काम केले.

  कामाची कुशलता व कोणतंही काम करण्याची तयारी यामुळे 2001 मध्ये इस्लामपूर मधील राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलामध्ये निटींग मास्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. उत्कृष्ट कामाची पद्धत यामुळे 2006 साली मशीन इरेक्शन प्रशिक्षणासाठी राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलामार्फत इराण दौऱ्यासाठी निवड झाली.
     इराण मधून भारतात परत आल्यानंतर राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलामध्ये निटिंग जनरल मॅनेजर पदावर काम केले. पण काम करता करता स्वतःचा निटिंग कापडाचा व्यवसाय असावा अशी प्रचंड इच्छाशक्ती होती. यामुळेच 2010 मध्ये इचलकरंजी मध्ये भाड्याच्या जागेत दोन निटिंग मशीन खरेदी करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. प्रामाणिक काम आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर 2014 साली लक्ष्मी औद्योगिक वसाहत हातकणंगले मध्ये श्री. रेणुकामाता निटिंग अँड गारमेंट या नावाने स्वतःची कंपनी चालू केली. पंधरा मेड इन जर्मनी नीटिंग मशीनचा प्रकल्प चालू करून हातकणंगले भागामध्ये मराठी मुलांसाठी एक आदर्श निर्माण करून दिला.

   एक यशस्वी उद्योजक असून सुद्धा आज देखील कामगारां सोबत काम करण्याची सवय ही एक आदर्श नेतृत्वाचे उदाहरण म्हणावे लागेल. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक असून सुद्धा आज देखील आपल्याला कंपनीमध्ये कामगार सोबत काम करताना दिसणारा हा एक यशस्वी उद्योजक खरंच प्रेरणादायी ठरेल.
  ज्या मातीत जन्माला आलो. त्या मातीचे ऋण फेडणे आद्य कर्तव्य म्हणून अनेक सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतोच. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केलं. 2001 साली शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सेनापती पदी निवड झाली. लोकांबद्दल असलेली आपुलकी व प्रचंड जनसंपर्क यामुळे 2017 सालच्या आळते गावच्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली. तसेच आळते गावचे उपसरपंच पदाची माळ देखील गळ्यात त्यांच्या पडली.
ग्रामीण भागातील एक कामगारांपासून एका यशस्वी उद्योजकापर्यंत हा खडतर प्रवास नव उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी ठरत आहे.

आपल्या आदर्शवत कार्याला MSK Digital Group चा सलाम….

शब्दांकन
मनीष कुलकर्णी .
संपादक
एम एस के डिजिटल न्यूज

error: Content is protected !!