आम. सुभाष देशमुख कोरोनामुक्त ;दृढनिश्चय करून कोरोनावर मात करा

सोलापूर /ताः20

       कोरोनावर मात करण्याची ताकद आपल्या स्वतःमध्येच आहे. डॉक्टर आणि प्रशासन त्यांचे काम करत आहे. मात्र इच्छाशक्ती दृढ असली तर निश्चित आपण कोरोनावर मात करु शकतो, असे प्रतिपादन आम . सुभाष देशमुख यांनी केले.

      आम . सुभाष देशमुख यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. गेल्या दहा दिवसांपासून ते होम क्वारंटाइन होते. डॉक्टरांनी केलेले उपचार आणि स्वतः केलेला दृढनिश्चय यामुळे आम . देशमुख यांनी दहा दिवसात यावर मात केली. आज ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
याविषयी बोलताना आम . देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या काळात दक्षिण मतदारसंघात अनेकदा येणे-जाणे झाले. विविध संघटना, संस्था यांना भेटी दिल्या. आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. अशा परिस्थितीत दाढ दुखत होती. ती काढल्यानंतर अशक्तपणा जाणवला. त्यामुळे सतर्कता बाळगत आपण कोरोनाची चाचणी केली. यामध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या काळात आपण डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार घरीच उपचार घेतले. आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे . हा निश्चय मनामध्ये केला आणि त्यामुळे आज दहा दिवसांनी आपण कोरोना मुक्त झालो. नागरिकांनीही कोरोनाबाबत भीती बाळगू नये, शासनाचे सर्व नियम पाळावे, सोशल डिस्टन्स ठेवावे, मास्क वापरावा, विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्याची ताकद आपल्यामध्येच आहे. डॉक्टर आणि प्रशासन त्यांचे काम करत आहे. मात्र स्वतःमध्ये दृढनिश्चय करावा, मोठी इच्छाशक्ती बाळगावी, असे केल्यास निश्चितच सर्वजण कोरोनावर मात करतील, असेही आ. देशमुख म्हणाले.

                                            सोलापूरकरांच्या प्रेमामुळे बरा झालो: देशमुख
मनामध्ये कोरोनावर मात करण्याचा दृढनिश्चय होताच. याशिवाय तमाम सोलापूरकरांचे प्रेमही मला मिळाले. स्वामी समर्थ, पांडुरंग आणि श्री सिद्धरामेश्वर यांच्या आशीर्वादामुळे आपण ठणठणीत बरे झालो आहोत. लवकरच आपण जनतेच्या सेवेसाठी पुन्हा रुजू होऊ, असेही आमदार देशमुख म्हणाले.   

error: Content is protected !!