रुई ग्रामपंचायतीवर शाहू आघाडीचा झेंडा

सरपंचपदी (sarpanch) सौ.करिश्मा इम्रान मुजावर, उपसरपंचपदी युनूस मकानदार यांची बिनविरोध निवड

रुई/राकेश खाडे

सरपंच
सौ.करिश्मा मुजावर

उपसरपंच
युनूस मकानदार

   रुई (rui) (ता. हातकणंगले) येथील सरपंच, उपसरपंच निवडीच्या निमित्ताने ग्रामपंचायतीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकला. सरपंचपदी सौ. करिश्मा इम्रान मुजावर यांची तर उपसरपंचपदी युनूस मकानदार यांची आज बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परिसचंद्र आलाटकर यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही.बी. कांबळे, तलाठी गणेश आवळे उपस्थित होते.
    शाहू विकास आघाडीकडे अकरा तर विरोधी परिवर्तन महाविकास आघाडीकडे सहा सदस्य होते. परिवर्तन आघाडीने शाहू विकास आघाडीचे सदस्य फोडण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न केला मात्र त्यांना सपशेल अपयश आले. अखेर शाहू आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधी आघाडीने सरपंच, उपसरपंच पदासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले परिणामी दोन्हीही निवडी बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोन जेसीबींच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली.
   निवडीनंतर गावातील प्रमुख मार्गावरुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्याचे सभेत रुपांतर झाल्यानंतर बाबासाहेब हुपरे, अभय काश्मीरे, संजय मगदूम, इम्रान मुजावर, युनूस मकानदार यांची भाषणे झाली. भाऊसाहेब फास्के यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह पद्मान्ना हेरवाडे, जहाँगीर मुजावर, जयसिंग शिंदे, दिलावर मकानदार, रामचंद्र काश्मीरे,शब्बीर कोन्नूरे, राजू आवटे, रावसाहेब आबदान, आनंदा झपाटे,अमोल, आवटे आर.एस.मगदूम,सुनील साठे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!