महिला पोलिस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह

हातकणंगले /ताः २०

        हातकणंगले पोलीस स्टेशनमधील तरुण महिला कॉन्स्टेबलचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस स्टेशन आवारात खळबळ उडाली आहे . मात्र संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलची सहकारी महिलेचा रिपोर्ट मात्र निगेटिव आला आहे .
          चार दिवसापूर्वी बाधित महिला कॉन्स्टेबल आरोपी घेऊन वडगाव न्यायालयात एका गुन्ह्यातील आरोपी घेऊन दाखल झाल्या होत्या . त्यामुळे वडगाव कोर्टामध्ये बाधीत महिला कॉन्स्टेबलचा संपर्क अन्य कुणाशी आला असेल याची माहिती घेणे गरजेचे आहे . पोलिस स्टेशन मधील काही अन्य सहकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन स्वॅब टेस्टसाठी नमुने दिले असुन रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिले आहे .

error: Content is protected !!