सुतगिरणीच्या अधिकाऱ्याचा अचानक मृत्यु . स्वॅब तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा, सुतगिरणी परिसरात घबराट.

हातकणंगले /ता : २०

          हातकणंगले तालुक्यातील एका नामांकित सूतगिरणीच्या प्रॉडक्शन मॅनेजर यांचा आज पहाटे तीन वाजता अचानक मृत्यू झाला . मागील तीन दिवसापासुन त्यांना खोकला व ताप होता . काल रात्री अकरा वाजता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते . मात्र पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला . त्यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. तसेच मयत प्रॉडक्शन मॅनेजरला इचलरंजीतील  मॉडर्न हायस्कूल जवळील डॉक्टर कडे तीन दिवस उपचार सुरू होते . त्यामुळे त्या डॉक्टरांना सुद्धा होम क्वॉरटाईन होणेच्या सूचना दिल्या आहेत

           प्रॉडक्शन मॅनेजर शुक्रवारी सूत गिरणी मधील जवळपास तीस ते पस्तीस लोकांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते . यामध्ये सुतगिरणीचे कार्यकारी संचालक , व्हाईस चेअरमन व ऑफिस स्टाफ यांचा समावेश आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत या सर्वांना होमक्वांरटाईन होण्याच्या सूचना दिले असल्याचे समजते . मृत झालेल्या कोरोना व्यक्तीचा चाचणी अहवाल येण्याअगोदरच संपूर्ण सूतगिरणी परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले झाले आहे .

error: Content is protected !!