कोवीड सेंटर व स्वँब केंद्र तात्काळ सुरू होणार -खास. माने

हुपरी /ताः २३ ( वार्ताहर )

       हुपरी ( ता.हातकणंगले ) शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने खासदार धैर्यशील माने यांनी हुपरी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी काल पासुन जिल्हाधिकारी दौलत देसाई व संबधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन कोवीड केअर सेंटर,स्वँब संकलन केंद्र येथे उभे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले.यासाठी नगरपालिकेला शाळा बघुन त्या ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.तसेच लागणारे डाँक्टर्स व इतर स्टाफसाठी खाजगी डाँक्टरांना मदतीसाठी घेण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
       हुपरीतील संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी वाहणांची व्यवस्था करणे, कटेंन्मेंट झोनवर पोलीस बंदोबस्त ठेवणे. यासाठी होमगार्ड वाढविण्यास जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सोबत बोलुन निर्णय घेतला गेला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा यांचे वतीने हुपरीमध्ये ग्रामीण रुग्णालय व्हावे याबाबतचे निवेदन खासदार माने यांना देण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाठ,अमित गाठ,स्नेहलता कुंभार,राजेंद्र मस्के, तसेच सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


सोशल डिस्टन्स ठेवुन खास . धैर्यशील माने बैठक घेताना सोबत नगराध्यक्षा जयश्री गाठ व अन्य मान्यवर

error: Content is protected !!