पोलीस ,नर्सिंग विभागास ब्रु कॉफी वाटप

इचलकरंजी /ता : २५

         मागील चार महिन्यांपासून अविरतपणे समाजाचं देणं लागतो . या भावनेने सुरू असलेल्या कोरोणाच्या महामारी मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस व नर्सिंग अशा अनेक कोरोना योद्ध्यांना ब्रू कॉफीचे वाटप करण्यात आले . हा उपक्रम चांगुलपणाची चळवळ , अन्नक्षेत्र फौंडेशन व ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्या वतीने करण्यात आले . इचलकरंजी येथील वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले . यावेळी मुळे फौंडेशनचे सचिव रघुविर सिंह राठोड , उपाध्यक्ष शैला कांबरे , डॉ . ज्योती बडे , डॉ . दशावतार बडे , प्रतिभा सिंगगरे , संध्या चौगुले , उत्कर्ष फडणीस , अनिल नानिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते . या उपक्रमाची सुरुवात अन्नक्षेत्र फाऊंडेशनच्या अरुणा पुरोहित व चांगुलपणा चळवळीचे डॉ . ज्ञानेश्वर मुळे यांनी केली आहे यावेळी मुळे फौंडेशनचे सचिव रघुविर सिंह म्हणाले , शासनाच्या मुळ उद्देशाला अनुसरून आश्वासक मदत करण्याचा हेतु आमचा सदैव राहील .

ब्रु कॉफी वाटप करताना फौंडेशनचे पदाधिकारी व पोलीस ,नर्सिंग विभागाचे कोरोना योद्धे व अन्य मान्यवर
error: Content is protected !!