कोव्हिड काळजी केंद्र आणि रुग्णालयात सेवा देण्यासाठी संस्थांनी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर / ताः 26 (जि.मा.का.)

        जिल्ह्यातील कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्र आणि रुग्णालयामध्ये सेवा देण्यासाठी डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि सेवा भावी संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे यांच्या 9422404242 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

          जिल्हाधिकारी दौलत देसाई

                 कोल्हापूर वॉरियर्स या संकेतस्थळावर यापूर्वी नाव नोंदविलेल्या संस्थांना आणि व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संपर्क साधण्यात येईल. नव्याने नोंदणी करणाऱ्यांनी श्री. शिंदे यांच्या व्हॉटस् ॲप क्रमांकावर आपले नाव, पत्ता, आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल पाठवावा. या सर्वांची सोमवारी बैठक घेण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!