साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याला कोरोणाची लागण , गावात आणखी आठ जण बाधीत .नऊ जणांची स्वॅब तपासणी.

हातकणंगले /ता : २०

      हातकणंगले तालुक्यातील उत्तरेला बाजूला लोकनेत्याच्या नावाने सुरू असलेल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे . त्यामुळे कारखान्यासह परिसरातील नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे .
             कारखान्यातील इलेक्ट्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुरुवातीला थोडा ताप जाणवू लागला . त्याची तात्काळ तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . बाधित कर्मचारी हा साखर कारखान्याच्या गावातच राहत आहे . त्याच्या घराशेजारील सांगलीला जाऊन आलेल्या दाम्पंत्याला यापुर्वीच कोरोणाची लागण झाली आहे . त्यांच्याच संपर्कातून यापुर्वी आठ जणांना लागण झाली असुन पोलीस पाटील संपर्कात आल्याने त्यांना देखील मागील तीन दिवसापासुन क्वॉरटाइन केले आहे . कारखान्यातील इलेक्ट्रिक विभागातील नऊ कर्मचाऱ्यांचे घोडावत येथील कोवीड सेंटरवर तपासणीसाठी नमुने दिले आहेत . रिपोर्ट आल्या नंतरच प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे .

error: Content is protected !!