लॉकडाउनचे काटेकोर पालन करा , उपअधीक्षक प्रणिल गिल्डा

रुई / ताः२१ मनोज अथणे

              कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १०० % लॉकडाउन करण्याचा आदेश दिला आहे . याच आदेशाच्या अनुषंगाने कारवाई होत आहे . संपुर्ण जिल्हा लॉकडाउन करण्यात आला आहे . लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे . यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. हातकणंगले पोलिसांच्या वतीने पोलिस स्टेशन हद्दीत लॉकडाउनचे काटेकोर पालण व्हावे .यासाठी हातकणंगले पोलिस उप अधिक्षक प्रणिल गिल्डा स्वतः प्रत्येक गावात पाहणी करीत आहेत . कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे काटेकोर पणे पालन होणे गरजेचे आहे . यासाठी पोलिस प्रशासन जोमाने कार्यरत आहे.
           दरम्यान नागरीकांना लॉकडाउनचे पालन करावे . व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले आहे. त्यांनी रुई (ता. हातकणंगले ) येथे भेट देवून पाहणी केली.
रूई गावातील त्यांच्या भेटीप्रसंगी पोलिस कॉंस्टेबल दिग्विजय देसाई , रोहित पाटील,नितिन रेंदाळे,शरद गावित,सतिश इंगळे,सचिन कोरे, पोलिस पाटील नितीश तराळ, शरीफ मकुभाई, एलिया माने आदी उपस्थित होते .

error: Content is protected !!