औषधांचा काळाबाजार त्वरित थांबवुन कडक कारवाई करा – नाम .यड्रावकर यांचा आदेश

मुंबई /ताः २१ (वार्ताहर )

     अन्न व औषध प्रशासन विभागाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार होत असेल तर प्रभावीपणे तपास करून व कडक कारवाई करावी .असा आदेश विभागाच्या अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला . आज अन्न व औषध प्रशासनाच्या राज्य मुख्यालयाला त्यांनी भेट देऊन प्रयोगशाळा, इमारत व मुख्यालयाची पाहणी केली. अन्न व औषध प्रशासनाची अद्यावत प्रयोगशाळा बांद्रा , मुंबई येथील मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर उभारण्यात येत आहे. या प्रयोगशाळेसाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निधी उपलब्ध करून देणार आहेत . त्यासाठी इमारतीच्या व प्रयोगशाळेच्या कामकाजात गती यावी . व लवकरात लवकर ही प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्यमंत्री यांनी भेट दिली.

मुंबई येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेताना नाम . राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) व सर्व अधिकारी वर्ग

       या भेटीदरम्यान आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी विभागाच्या कामकाजाच्या अनुषंगाने माहिती सादर दिली. विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणून सध्याच्या कोरोना काळात आवश्यक औषधांचा कृत्रिम तुटवडा करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत नाम . यड्रावकर यांनी सूचना दिल्या. विभागाची प्राथमिकता कोरोना संबंधित कामकाजाला दिलीच पाहिजे . मात्र दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, ऑनलाइन पद्धतीने पार्सल पध्दतीने पोहचविले जाणारे पदार्थ सुद्धा सुरक्षित आहे किंवा नाही . हे सुद्धा पाहणी करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. या सर्व अन्न आस्थापनावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काटेकोर लक्ष देणे आवश्यक आहे . असेही त्यांनी सांगितले. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर यातील फरक सामान्य नागरिकांना कळणे कठीण असते. याचा फायदा घेऊन अनेक कंम्पन्या आपले प्रॉडक्ट बाजारात विकतात. शिवाय खुल्या लूज कंटेनर मध्ये सुद्धा शुद्ध केलेले पाणी सर्रास विकले जाते. यातून आरोग्याला धोका होऊ नये . यासाठी विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जागरूक राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
        राज्यात नागपूर व पुणे येथील मुख्यालयात अद्यावत प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासन कटीबद्ध असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण व उर्वरित कामास पूर्णत्व देण्यास प्राधान्य राहील . असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीचे वेळी मुख्यालयातील सर्व सहआयुक्त यांनी आपापल्या विभागाच्या कामकाजाबाबत उद्दिष्टे व साध्य याबाबत माहितीचे सादरीकरण केले. यावेळी श्री अरुण उन्हाळे (आयुक्त अन्न व औषध प्रशासन) सहआयुक्त श्री. परळीकर, श्री. केकरे श्री. बियाणी व मुख्यालयातील सहायक आयुक्त हजर होते.

error: Content is protected !!