गारगोटी / आनंद चव्हाण
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील पती पत्नीने आजारास कंटाळून आत्महत्या केली, विशेष म्हणजे पती इंजिनिअरिंग कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी होते . आर्थिक परिस्थिती उत्तम असतांना या पती पत्नीने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. तर गावांवर शोककळा पसरली आहे. सदाशिव बाळू भांदिगरे (वय ६२), सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय- ५७ असे या पती पत्नीचे नाव आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.

सदाशिव भांदिगरे व त्यांची पत्नी सुरेखा हे दोघेही आजारास कंटाळले होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. आज दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून ११. ३० वाजण्याच्या सुमारास घराला लागून असलेल्या जनावारांच्या गोठ्यात लोखंडी पाईपला दोरी लावून पती- पत्नीने गळफास घेतला.
सकाळपासून दोघांचीही चाहुल न लागल्यामुळे शोधाशोध केली असता भांदिगरे पती-पत्नीचा मृतदेह गोठ्यात लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले असल्याची वर्दी सदाशिव यांचा भाऊ निवृत्ती भांदिगरे यांनी पोलीसात दिली.
भांदिगरे दांम्पत्यास दोन विवाहित मुले असुन उच्च शिक्षित आहेत. गारगोटी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
आपल्या कॉलेजला कालच दिली देणगी
विशेष म्हणजे सदाशिव भांदिगरे हे श्री मौनी विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चांगल्या पदावर नोकरीस होते, त्यांनी कालच कॉलेजच्या प्राचार्य यांचेकडे २५ हजाराच्या देणगीचा धनादेश दिला आहे . या गोष्टीची चर्चा चालू आहे.