हातकणंगलेत जुगाऱ्यांना अटक ; दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश

हातकणंगले /ता : 23

     हातकणंगले येथील दत्त मेडिकल समोर तीनपानी  जुगार खेळणाऱ्या सात जणांना हातकणंगले पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली . त्यांच्याकडून पाच मोबाईल संच व रोख रकमेसह 13100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई उपअधिक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पाटील ,अतुल निकम व सुहास गायकवाड यांनी केली आहे .

          या कारवाईमध्ये सचिन प्रकाश मोरे , महेश अशोक पांडव , संदीप प्रकाश मोरे ,निहाल औरंगजेब मुजावर , भाऊसो आण्णासो कदम , नागेश दुर्गाप्पा हंचनाळ आणि हारूण सिकंदर मुजावर (रा . सर्व हातकणंगले ) या सात जणांचा समावेश असून यामधील दोघेजण रेल्वे विभागामध्ये नोकरी करीत आहेत . पुढील तपास शंकर पाटील करीत आहेत .

error: Content is protected !!