संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये मूल्याधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी

    संजय घोडावत पॉलीटेक्नीकच्या (Sanjay Ghodawata Polytechnic) कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व प्रोसेस अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सेंटर एमएसएमई यांच्या संयुक्त विद्यमाने एका महिना कालावधीचा ”मूल्याधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कौशल्य विकासांतर्गत कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, सीएनसी मशीन टर्निंग या कोर्स प्रशिक्षणास एमएसएमई ची मान्यता मिळाली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ५०० रुपये नावनोंदणीसह वय वर्ष १८ ते ४५ वयातील युवक युवती लाभार्थी पात्र असतील. तसेच पुनर्रकौशल्य अंतर्गत विविध फौंड्री विभागात काम करणाऱ्या अनुसूचित जातीच्या संवर्गातील उमेदवारांसाठी फौंड्री असिस्टंट या कोर्सचे प्रशिक्षण या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आले आहे.  यामध्ये ३००० रुपये विद्यावेतनासह विनामूल्य एक महिना प्रशिक्षण मोफत पुरविले जाणार आहे.
    याबाबत बोलताना प्राचार्य विराट गिरी म्हणाले ” हा प्रशिक्षण कार्यक्रम सर्व संवर्गातील उमेदवारांसाठी असून मूल्याधारित कौशल्य विकसित करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा उमेदवारांना होणार आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा.अजय कोंगे म्हणाले” सदरचे कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या लाभार्थीना सूक्ष्म व लघुउद्योग मंत्रालय भारत सरकार यांचे प्रमाणपत्र मिळणार असून या उमेदवारांना या प्रशिक्षण कार्यक्रमात तांत्रिक कौशल्य व जीवनउपयोगी कौशल्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रमाणपत्राचा नोकरी व नवीन उद्योग उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तरी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कोल्हापूर जिल्हा व परिसरातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
    या प्रशिक्षण कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!