रुग्णालयातील कर्मचारीच कोरोना पॉझिटीव्ह ; युध्दपातळीवर यत्रंणा सज्ज

वारणानगर /ता: २३ शिवकुमार सोने

             पन्हाळा तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या कोडोली (ता.पन्हाळा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका सफाई कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने कोडोली व पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कामगारास पाच दिवसापूर्वी ताप आल्याने कोडोली उप जिल्हा रुग्णालयातच दाखल केले होते. मंगळवारी त्याला पन्हाळा एकलव्य कोरोना दक्षता केंद्रात दाखल केले . तेथे त्याचा स्वॅब घेतला होता . आज गुरूवारी सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्तीच्या राहत्या ठिकाणी व उपजिल्हा रुग्णालयात ग्रामपंचायत कोरोना समितीकडुन सर्व आवश्यक उपाययोजनांसह फवारणी व परिसर सील करणेची प्रक्रिया सुरू आहे.
           उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका,कर्मचारी यांच्या व गावातील अनेकांच्या संपर्कात हा कामगार आल्याने संपर्क बाधितांची यादी तयार करण्याचे काम आरोग्य यंञणा, ग्रामपंचायत कोरोना समिती व कोडोली पोलीसांच्या वतीने युध्दपातळीवर सुरू आहे तसेच विलगीकरणाबाबतही प्रक्रिया सुरू आहे. कोडोलीसारख्या मोठ्या शहरामध्ये पहिल्यांदाच कोरोना पाॅझिटिव्ह रूग्न सापडल्याने गावात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
        तथापि नागरीकांनी घाबरून न जाता सुरक्षित घरी राहण्याचे आवाहन आरोग्य यंञणा, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोडोली: कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीची गल्ली सील करून फवारणी करताना आरोग्य यंञणा,पोलीस व ग्रामपंचायत कोरोना समिती

error: Content is protected !!