ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना स्नेहल गारमेंटकडुन किटचे वाटप

रुई / ता :२१

           रुई गावात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार ज्या भागात रुग्ण आढळले तो भाग सील करणे . तसेच त्या भागात औषध फवारणी करणे , अत्यंत आवश्यक असते. पण हे करत असताना आपल्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे काही सदस्य व ग्रामपंचायतीचे कर्मचारी स्वतःची व परिवाराची पर्वा न करता आपले कर्तव्य समजून विना पीपीई किट व कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाविना सदरचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत.
          ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संरक्षणा बाबतचे गांभीर्य लक्षात घेत आज तात्काळ स्नेहल गारमेंटने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत रुई गावातील ८ कोविड योद्धयाना पीपीई किटचे वाटप करून त्यांच्या कर्तव्याचे कौतुक केले. तसेच या मदतीमुळे कर्मचाऱ्यातुन समाधान व्यक्त केले.
यावेळी स्नेहल गारमेंटचे सचिन लाड, महेश मुरचिट्टे, किरण हुपरे, ताहिर मकुभाई, अविनाश वडगावे,आप्पासो चेंडके, दिग्विजय पाटिल, अवधूत पाटील
आदी उपस्थित होते.

रुई येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पीपीई किट वाटप करताना सचिन लाड, महेश मुरचिट्टे सोबत नंदकुमार साठे व कर्मचारीवर्ग

error: Content is protected !!